Business

Monday, 18 April 2016

VIDEO: काळजाचा ठोका चुकवणारे सायकल स्टंट

खतरनाक स्टंटसाठी प्रसिद्ध असलेला स्टंट बायकर डॅनी मॅकस्किलच्या शॉर्टफिल्मने तब्बल सव्वा चार कोटी हिट्सचा टप्पा ओलांडला आहे. गिर्यार... thumbnail 1 summary

खतरनाक स्टंटसाठी प्रसिद्ध असलेला स्टंट बायकर डॅनी मॅकस्किलच्या शॉर्टफिल्मने तब्बल सव्वा चार कोटी हिट्सचा टप्पा ओलांडला आहे.

गिर्यारोहण, साहसी स्टंट्स असे आपण आजवर अनेकवेळा पाहिले असतील. पण स्टंट बायकर डॅनी मॅकस्किलने अफलातून शॉर्टफिल्म बनवली आहे. ‘द रिज’ नावाची ही शॉर्टफिल्म काळजाचा ठोका चुकवणारी आहे.

यू ट्यूबवर ऑक्टोबर 2014 मध्ये ही शॉर्टफिल्म अपलोड करण्यात आली आहे.  याच शॉर्टफिल्ममध्ये डॅनी मॅकस्किल हा 992 मीटर म्हणजेच तब्बल 3 हजार 255 फुट उंचीच्या पर्वतावरुन सायकल चालवतो आहे. अत्यंत टोकदार दगडं, नद्या, झरे आदिंचे अडथळे अत्यंत चपळाईनं दूर सारत डॅनी आपल्या घरी कसा पोहचतो याचं सुंदर आणि मनमोहक चित्रण या व्हिडीओत करण्यात आलं आहे.

30 वर्षीय डॅनी मॅकस्किलचा हा व्हिडीओ नेटिझन्सच्या चांगलाच पसंतीस उतरतो आहे.

हृदयाचा ठोका चुकवणारे स्टंट्स आणि अतिशय सुंदर असणारी ही शॉर्टफिल्म पाहताना आश्चर्याचा धक्का बसला नाही तर नवलच..

व्हिडिओ पाहा 

No comments

Post a Comment