Business

Monday, 18 April 2016

व्हायरस : फेसबुक मेसेजमधील अश्लिल व्हिडिओ उघडू नका, अन्यथा...

सध्या फेसबूकच्या माध्यमातून एका व्हायरसने सोशल मीडियात मोठा धुमाकूळ घातला आहे. फेसबूकच्या मेसेज बॉक्सच्या माध्यमातून हा व्हायरस सध्या व... thumbnail 1 summary

सध्या फेसबूकच्या माध्यमातून एका व्हायरसने सोशल मीडियात मोठा धुमाकूळ घातला आहे. फेसबूकच्या मेसेज बॉक्सच्या माध्यमातून हा व्हायरस सध्या व्हायरल झाला आहे.

तुमच्या मित्राच्या अकाऊंटवरुन तुम्हाला तुमच्या मेसेज बॉक्समध्ये एखादा व्हिडिओ आला तर तो अजिबात उघडू नका. कारण तो अश्लिल व्हिडिओ असतो आणि एकदा तुम्ही तो उघडला की तो आपोआप तुमच्या मित्रयादीतील सगळ्या मित्रांना तो अश्लील व्हिडिओ पाठवला जातो.

तसेच काही जणांच्या फेसबूक वॉलवरही आपोआप अशा प्रकारचे व्हिडिओ पोस्ट होत असल्याचं दिसून आलं आहे.

धक्कादायक प्रकार म्हणजे तुमचं फेसबूक अकाऊंटही हॅक होऊ शकतं. त्यामुळे काळजी घ्या. आपापल्या फेसबूक अकाऊंटचे पासवर्ड तातडीने बदला.

दरम्यान, फेसबूकने अद्याप या व्हायरसबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

हा व्हायरस नेमकं काय करतो?

हा व्हायरस तुमच्या फ्रेंडलिस्टमधील मित्रांना हा व्हिडीओ टॅग करतो. याशिवाय तुमच्या वॉलवर एकदाच नव्हे तर अनेकवेळा हा व्हिडीओ पोस्ट होऊन मित्रांना टॅग करतो. मित्रांना टॅग झाल्यानंतर पुन्हा त्यांच्यामार्फत हा व्हायरस फॉरवर्ड होतो.

हा व्हायरस कसा ओळखायचा?

हा व्हायरस ओळखण्याचा सोपा उपाय म्हणजे, या व्हिडीओचा यूआरएल फेसबुकचा नाही. दुसरं म्हणजे तुम्हाला एक मेसेज दिसेल, त्यामध्ये तुमचा पर्सनल डाटा बदलण्याची परवानगी मागेल. एकदा का तुम्ही पर्सनल डाटा बदलण्याची परवानगी दिली, तर हा व्हायरस तुमच्या अकाऊंटमध्ये घुसतो. यामुळे तुमचा फेसबुक डेटा हॅक होऊ शकतो, इतकंच नाही तर तुमचा डेटा सहज चोरी करू शकतो.

No comments

Post a Comment