Business

Monday, 18 April 2016

फेसबुकचं नवं मेसेंजर अॅप चॅटबोट्स लॉन्च

फेसबुक इंकने आपलं नवं मेसेंजर अॅप तयार केलं आहे. चॅटबोट्स असं या अॅपचं नाव असून या अॅपच्या माध्यमातून युजर्स थेट ई-कॉमर्स कंपन्या आणि... thumbnail 1 summary



फेसबुक इंकने आपलं नवं मेसेंजर अॅप तयार केलं आहे. चॅटबोट्स असं या अॅपचं नाव असून या अॅपच्या माध्यमातून युजर्स थेट ई-कॉमर्स कंपन्या आणि ई-कॉमर्स ज्या कंपन्यांशी जोडल्या गेल्या आहेत, अशा कंपन्यांशी जोडले जाणार आहेत.

चॅटबोट्सबाबत फेसबुकने सांगितले की, “हे अॅप अशा लोकांसाठी उपयुक्त ठरेल, ज्यांचं काम ऑनलाईन खरेदी-विक्री आणि ऑनलाईन बिझनेसशी संबंधित आहे.”

हे अॅप कसं काम करेल?

तुम्हाला एखाद्या रुमची आवश्यकता आहे आणि तुम्ही समजा चॅटबट्स अॅपवर तसा मेसेज पोस्ट केलात, तर तुम्हाला उत्तरादाखल हॉटेल कंपनीच्या माध्यमातून रुमच्या अव्हॅलिबिलीटी आणि किंमतीचा मेसेज येईल. एकंदरीत अशाप्रकारे हे अॅप काम करणार आहे.

ग्राहक सेवा अधिक वेगवान बनवण्याच्या दृष्टीने या अॅपची निर्मीती करण्यात आली आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी या अॅपमध्ये सर्व प्रकारच्या कंपन्यांची माहिती तयार असेल.

सोफी, एक ई-कॉमर्स कंपनी आणि सीएनएन न्यूज यांच्या मदतीने फेसबुकने हे अॅप तयार केलं आहे. व्यापार क्षेत्रात बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून हे अॅप फेसबुकने लॉन्च केल्याची माहिती मिळते आहे.

या अॅपच्या माध्यमातून ग्रहकांना आता कस्टमर केअरना फोन करण्याची आवश्यकता भासणार नाही. ग्राहक थेट कंपन्यांशी संवाद साधू शकणार आहेत.

No comments

Post a Comment